मित्रांनो, तुम्हाला नवीन Computer किंवा Laptop घेताना प्रश्न पडला असेल कि HDD व SSD म्हणजे काय ? त्यांचे फायदे व तोटे कोणते आहेत ? या प्रश्नांचे उत्तर आज मी तुम्हाला या Article मध्ये अगदी व्यवस्थितपणे देणार आहे. तुम्ही जेंव्हा एखादा संगणक खरेदी करण्यासाठी जाता तेंव्हा संगणकाचे Storage Drive निवडताना तुमच्या समोर दोन पर्याय उपलब्ध असतात, आणि ते म्हणजे HDD किंवा SSD. हे Computer मध्ये Data साठवून ठेवण्याचे दोन प्रकार आहेत.
बऱ्याच लोकांना HDD व SSD यांच्याविषयी जास्त माहिती नसते व त्यामुळेच ते Storage Drive निवडताना चुक करतात, व त्यांना योग्य अशी Storage Drive मिळत नाही. त्यामुळेच त्यांची Computer System चांगल्या पद्धतीने काम करत नाही. म्हणुनच योग्य अशी Storage Drive निवडनं खुप गरजेच असते.
योग्य Storage Drive निवडनं हे पुढील काही कारणांवर अवलंबुन असते – आपल्याला Computer System चा वेग किती हवा आहे आणि आपले बजेट किती आहे. कारण SSD च्या किंमती या HDD पेक्षा जरा जास्तच असतात. त्यामुळे आपण आपल्या बजेट नुसार Storage Drive ची निवड करु शकतो.
अनुक्रमणिका
HDD म्हणजे काय – What is Hard Disk Drive in Marathi ?
HDD म्हणजेच Hard Disk Drive. HDD ला सर्वप्रथम IBM कंपनीने 1956 मध्ये जगासमोर आणले. तसेच तेंव्हापासून HDD मध्ये योग्य त्या केल्या गेलेल्या सुधारणांमुळे HDD ची Storage क्षमता ही आज आपल्याला वाढलेली दिसून येते. भारतात Toshiba, Western Digital, Seagate तसेच Lenova या काही प्रसिद्ध कंपन्या आहेत ज्या Hard Disk Drive च्या उत्पादनात खुप नावाजलेल्या आहेत.
Hard Disk Drive मध्ये एक फिरती चकती असते जी एका चुंबकीय टोकापासुन Read किंवा Write केली जाते. HDD ची Read किंवा Write करण्याची क्षमता हि तीच्या Disk Size वर तसेच ती किती वेगाने फिरु शकते यावर अवलंबून असते. जितक्या जास्त वेगाने Disk फिरेल तितक्याच जास्त वेगाने Data हा Read किंवा Write केला जावू शकतो.
HDD हि Computer साठी 3.5 इंच व Laptop साठी 2.5 इंच इतक्या साइज मध्ये उपलब्ध आहे. तसेच HDD ची Storage क्षमता हि 1 TB ते 6 TB व त्यापेक्षाही जास्त असलेली पाहायला मिळते. या स्टोरेज डिस्क चा वापर जवळपास सर्वजन आपल्या Computer किंवा Laptop मध्ये करतात. कारण HDD ची किंमत ही SSD पेक्षा 3 ते 4 पट कमी असते. त्यामुळे खुप सारे लोक HDD चा वापर करणे पसंद करतात.
HDD वापरण्याचे फायदे व तोटे
HDD वापरण्याचे आपापले असे फायदे व तोटे आहेत ते खालीलप्रमाणे.
HDD वापरण्याचे फायदे
- HDD हि SSD च्या तुलनेत 3 ते 4 पट कमी किंमतीत मिळत असल्यामुळे आपण कमी पैशांमध्ये जास्त Data Store करु शकतो.
- Hard Disk Drive हि किंमतीने स्वस्त असल्यामुळे याचा वापर खुप सारे लोक करतात आणि त्याचमुळे HDD ची बाजारपेठेमध्ये मागणी देखील खुप आहे. मागणी जास्त असल्यामुळे HDD हि आपल्याला आपल्या जवळच्या बाजारपेठेत अगदी सहजरीत्या उपलब्ध असलेली दिसुन येते.
- HDD ची मागणी जास्त असल्यामुळेच यामध्ये आपल्याला जास्त Storage Capacity असणाऱ्या Hard Disk Drives सहजरित्या मिळू शकतात. त्यामध्ये 1 TB ते 10 TB तसेच यापेक्षाही जास्त Storage असणाऱ्या HDD आपल्याला पाहायला मिळतील.
HDD वापरण्याचे काही तोटे
- HDD चा Read व Write करण्याचा वेग हा SSD च्या तुलनेत खुपच कमी असतो. त्यामुळेच HDD हि खुप Slow Work करते.
- Hard Disk Drive मध्ये Moving Part असल्यामुळे Disk फिरत असताना त्याचा थोडाफार आवाज येतो. तसेच HDD ला SSD च्या तुलनेत जास्त वीज लागते.
- HDD मध्ये Moving Mechanism असल्यामुळे आपल्या हातुन चुकून जर Hard Drive खाली पडली तर ती खराब होण्याची शक्यता जास्त आहे.
- जेंव्हा तुम्ही तुमचा Computer किंवा Laptop चालू करता तेंव्हा तो व्यवस्थित चालू होण्यासाठी खुप वेळ लागतो त्यालाच आपण Boot Time Slow असे म्हणतो. SSD मध्ये आपल्याला Boot Time Fast असलेला पाहायला मिळतो.
HDD कोणासाठी योग्य आहे
- HDD त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांचे बजेट कमी आहे.
- ज्यांना Computer चे Boot up Speed जास्त नसले तरी चालते.
- ज्या लोकांना Computer ची Storage क्षमता जास्त हवी आहे. मग तुम्ही बिनधास्तपणे HDD खरेदी करु शकता. तर तुमच्यासाठी Hard Disk Drive ही योग्य असेल.
SSD म्हणजे काय (What is Solid State Drive in Marathi) ?
SDD म्हणजेच Solid State Drive. SDD ला सर्वप्रथम SanDisk कंपनीने 1991 मध्ये जगासमोर आणले. तेंव्हापासून त्यामध्ये केल्या गेलेल्या आवश्यक अश्या नवीनतम सुधारणांमुळे आज SSD ची Storing Capacity आणि Working Speed खुप चांगले झाले आहे.
SSD मध्ये कोणत्याही प्रकारचा Mechanical Arm नसतो. त्याऐवजी SSD मध्ये एक Embedded Processor असतो ज्याला आपण Controller पण म्हणतो. SSD मध्ये Data, Read किंवा Write करण्याचे काम हा Controller करतो. जितका चांगल्या Quality चा Controller असेल तितकीच चांगली ती SSD मानली जाते. SSD मध्ये डेटा Read किंवा Write करण्याचा वेग हा सर्वस्वी Controller वर अवलंबुन असतो, त्यामुळे Controller जर चांगला असेल तर नक्किच त्या SSD चा डेटा Read व Write करण्याचा वेग जास्त असेल.
SSD ही दिसायला Hard Disk Drive सारखीच असुन भारतात Toshiba, WD My Passport, Seagate तसेच Lenovo या काही प्रसिद्ध कंपन्या आहेत ज्या Solid State Drive च्या उत्पादनात अग्रस्थानी आहेत.
SSD हि 1.8 इंच, 2.5 इंच आणि 3.5 इंच या साइज मध्ये उपलब्ध आहे. Solid State Drive ही आपल्याला 120GB, 128GB, 240GB, 480GB, 500GB तसेच यापेक्षाही अधिक क्षमता असणाऱ्या SSD बाजारात उपलब्ध आहेत. पण जितक्या जास्त क्षमतेच्या Hard Disk Drive उपलब्ध असतात तितक्याच जास्त क्षमतेच्या SSD उपलब्ध असतीलच असे काही नाही.
SSD या HDD पेक्षा 3 ते 4 पट अधिक किंमतीच्या असतात व त्यामुळेच SSD चा वापर खुप कमी लोक करतात. SSD चा वापर तेच लोक करतात ज्यांना Computer किंवा Laptop चे Speed जास्त हवे असते व त्यांना बजेटचा कोणताही Problem नसतो. वापर कमी असल्यामुळे Market मध्ये याची मागणी देखील कमी आहे व त्यामुळेच जास्त क्षमतेच्या SSD खुप कमी प्रमाणावर तयार केल्या जातात. आणि म्हणुनच Market मध्ये या जास्त क्षमतेच्या SSD सहसा उपलब्ध नसतात.
HDD वापरण्याचे फायदे व तोटे
SSD वापरण्याचे आपापले असे फायदे व तोटे आहेत ते खालीलप्रमाणे.
SSD वापरण्याचे फायदे
- SSD मध्ये Read व Write करण्याचा वेग हा HDD पेक्षा खुप जास्त असतो. त्यामुळेच SSD हि HDD च्या तुलनेत खुप Fast Work करते.
- जेंव्हा तुम्ही तुमचा Computer किंवा Laptop चालु करता तेंव्हा SSD हि HDD च्या तुलनेत लवकर Operating System Load करते तसेच SSD मध्ये आपल्याला Boot Time Fast असलेला पाहायला मिळतो.
- Solid State Drive मध्ये कोणताही Moving Part नसल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा आवाज होत नाही.
- SDD हि एक Advance Technology असल्यामुळे आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटोप चे Working Speed वाढलेले दिसून येते तसेच Computer चा Performance देखील अतिशय चांगला झालेला आपल्याला दिसून येतो.
- SSD मध्ये कोणत्याही प्रकारचा Mechanical Arm नसल्यामुळे यामध्ये होणारी विजेची खपत ही HDD पेक्षा खुपच कमी असते.
SSD वापरण्याचे काही तोटे
- SSD हि HDD च्या तुलनेत 3 ते 4 पट जास्त किंमतीत मिळत असल्यामुळे आपण कमी पैशांमध्ये जास्त Data Store करु शकत नाही. जर आपल्याला जास्त Data Store करायचा असेल तर आपल्याला त्याची जास्त किंमत मोजावी लागेल.
- Solid State Drive ची किंमत ही जास्त असल्यामुळे याचा वापर खुप कमी लोक करतात व त्यामुळेच SSD ची Market मधील मागणी HDD पेक्षा खुप कमी आहे. यामुळेच SSD ची बाजारपेठेतील उपलब्धता कमी आहे. तसेच SSD या HDD सारख्या जास्त क्षमतेच्या आपल्याला खुपच कमी आढळून येतात.
SSD कोणासाठी योग्य आहे
- SSD त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांचे बजेट खुप जास्त आहे.
- ज्यांना Computer चे Boot up Speed हे जास्त हवे आहे.
- ज्या लोकांना Computer ची Storage क्षमता कमी असली तरी चालत असेल. मग तुम्ही बिनधास्तपणे SSD खरेदी करु शकता. तर तुमच्यासाठी Solid State Drive ही योग्य असेल.
HDD व SSD चा एकत्रित वापर केला जावू शकतो ?
मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल कि HDD व SSD यांचा एकत्रितपणे वापर केला जावू शकतो का ? तर या प्रश्नाचे उत्तर आहे – “हो”
HDD व SSD या तंत्रज्ञानाचा वापर आपण अत्यंत चांगल्या प्रकारे करु शकतो. म्हणजेच ज्यांचे बजेट कमी आहे पण त्यांना Computer चा Performance देखील चांगला हवा आहे आणि Storage देखील खुप जास्त हवे आहे, अशा व्यक्ती HDD व SSD या तंत्रज्ञानाचा एकत्रितपणे वापर करु शकतात. आता तुम्ही म्हणाल कि हे कसे काय शक्य आहे ! काळजी करु नका या प्रश्नाचे उत्तर देखील आहे माझ्याकडे !!
Computer ची Operating System जर फास्ट Work करत असेल तरच आपला Computer जास्त वेगाने काम करु शकेल. त्यामुळे आपण काय करु शकतो कि फक्त Operating System हि SSD मध्ये Install करुन जास्त क्षमतेच्या Storage साठी Hard Disk Drive चा वापर करु शकतो.
उदाहरणार्थ – मला जर 1 TB च्या Storage ची गरज असेल तर मी 120 GB क्षमतेची Solid State Drive विकत घेईन व त्याचसोबत जास्त Storage साठी मी 1 TB क्षमतेची Hard Disk Drive घेईन आणि SSD मध्ये फक्त Operating System Install करुन बाकी HDD चा Extra स्टोरेज साठी वापर करेन. यामुळेच माझ्या Computer चा वेग देखील वाढेल आणि मला जास्त Storage देखील मिळेल.
निष्कर्ष
मी आशा करतो कि या Article द्वारे तुम्हाला समजले असेल कि HDD व SSD म्हणजे काय ? त्यांचे फायदे व तोटे कोणते आहेत. यामध्ये मी तुम्हाला अत्यंत सरळ व सोप्या पद्धतीने HDD व SSD यामधला फरक काय आहे याविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मी नेहमीच वाचकांना संपूर्ण माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न करतो कि जेणेकरुन त्यांना या Article च्या संदर्भात इतर कोणत्याही Website किंवा Internet वर शोधण्याची गरज नाही. यामुळे त्यांचा वेळही वाचेल आणि त्यांना एकाच ठिकाणी सर्व माहितीही मिळेल.
तुम्हाला सर्वकाही अत्यंत चांगल्या प्रकारे समजले असेल अशी मला अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त तुमच्या जर या Article विषयी काही शंका असतील तर नि:संकोच आम्हाला Comment करुन कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर आपल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करु.
माझी तुम्हा सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती आहे कि हा लेख तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्र-मंडळींना, नातेवाइकांना तसेच तुमच्या प्रियजनांसोबत Social Media वर जरुर शेअर करा. जेणेकरुन त्यांनादेखील HDD व SSD म्हणजे काय ? त्यांचे फायदे व तोटे कोणते आहेत. याविषयी अधिक माहिती मराठी भाषेमध्ये मिळू शकेल.
तसेच तुमचा या Article विषयीचा अमुल्य अभिप्राय आम्हाला Comment करुन नक्किच कळवा. आम्हाला आपला अभिप्राय वाचताना आनंदच होईल, धन्यवाद !!