स्मार्टफोन्स च्या दुनियेत रोज नवनवीन Innovations होत आहेत, या नवीन शोधांच्यामुळे सध्याचे Smartphones हे अधिक Secure होत चालले आहेत. यामध्ये सध्या आणखी एका Innovation ची भर पडली आहे आणि ती म्हणजे In-Display Fingerprint Sensor.
आपण आजपर्यंत आपल्या Smartphone ला Secure ठेवण्यासाठी पासवर्ड, पिन, पॅटर्न, Face Unlock तसेच फिंगरप्रिंट स्कॅनर यांचा वापर करत होतो, पण आजची Technology हि या सर्व पर्यायांच्या एक पाऊल पुढे गेली आहे.
अधिकांश Smartphones मध्ये आपल्याला मोबाईल अनलॉक करण्यासाठी Fingerprint Scanner असलेला पाहायला मिळतो. पण आज या Fingerprint Scanner ची जागा “In-Display Fingerprint Scanner” ने घेतलेली आहे. आपण आज या Article मध्ये याच विषयावर चर्चा करणार आहोत कि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी काय आहे.
अनुक्रमणिका
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी म्हणजे काय ?
आजकाल बऱ्याच Smartphones मध्ये आपल्याला फोन अनलॉक करण्यासाठी Fingerprint Scanner असलेला पाहायला मिळतो. हा Fingerprint Scanner स्मार्टफोन च्या मागिल बाजूस किंवा पुढील बाजुस Front Panel च्या जवळ किंवा Smartphone च्या Side ला दिलेला असतो.
पण आता इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर या टेक्नॉलॉजी वापर करुन हा Fingerprint Sensor स्मार्टफोन मध्ये Display च्या आतमध्येच बसवला गेला आहे. त्यामुळे आता हा Sensor आपल्याला Physically दिसणार नाही. तो मोबाईल Screen च्या आतमध्ये असल्यामुळे जेंव्हा आपण मोबाईल स्क्रिन वर Touch करु तेंव्हाच तो आपल्याला Virtually स्क्रिन वर दिसतो व आपला Smartphone Unlock होतो.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर हा Smartphone मध्ये सर्वप्रथम Vivo या कंपनीने आणला होता. त्यानंतर Xiaomi, Oppo आणि OnePlus या स्मार्टफोन कंपन्यांनी ही Technology आत्मसात केली व In-display fingerprint sensor असणारे Smartphones बाजारात आणले.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर चा जन्म कसा झाला ?
काही वर्षांपुर्वी लोकांमध्ये अशी अफवा पसरली होती कि Samsung आणि Apple या मोबाईल कंपन्या लवकरच In-Display Fingerprint Sensor असणारा Smartphone बाजारात Launch करणार आहेत. या सर्व गोष्टी घडत असताना कोणी विचार देखील केला नव्हता कि Apple व Samsung या लोकप्रिय Smartphone कंपन्यांच्या व्यतिरिक्त कोणी दुसरी कंपनी In-Display Fingerprint Sensor असणारा Smartphone Launch करेल.
Apple व Samsung या कंपन्या In-Display Fingerprint Sensor कशापद्धतीने बनवता येईल या विचारात व्यस्त असतानाच अचानकपणे Vivo या कंपनीने धमाकेदार पद्धतीने 24 जानेवारी 2018 रोजी आपला Vivo X20 Plus UD हा इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असणारा Smartphone बाजारात Launch केला.
Smartphone च्या display मध्ये Fingerprint Sensor असल्यामुळे या स्मार्टफोनने सर्व जगाचे लक्ष वेधुन घेतले. सर्वत्र Vivo या कंपनीचा बोलबाला होऊ लागला. Vivo ने Synaptics या US Based सेंसर मेकर अमेरिकन कंपनीसोबत मिळून Vivo X20 Plus हा जगातील पहिला In-display fingerprint sensor असणारा Smartphone बाजारात Launch केला व Samsung आणि Apple या नावाजलेल्या कंपन्यांना अचंबित करुन टाकले.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर कार्य कसा करतो ?
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मध्ये Optical Sensor असतो, जो Smartphone च्या Display मधील Glass च्या दोन Layers मध्ये Fingerprint ला Read करतो. डिस्प्ले च्या आतमध्ये असणारा Optical Fingerprint Sensor हा Blue लाईट बाहेर फेकतो व जेंव्हा User या सेंसर वर आपले Finger ठेवतो तेंव्हा हा सेंसर या Blue लाइट च्या मदतीने Fingerprint चा फोटा घेतो आणि तो फोटो Smartphone मध्ये Register असणाऱ्या Fingerprint शी मॅच होतो का ते बघतो.
जर तुमचा Fingerprint तुमच्या Smartphone मध्ये असणाऱ्या रजिस्टर Fingerprint सोबत Match होत असेल तर काही क्षणातच तुमचा Smartphone Unlock होतो.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी ही अद्ययावत अशी नवीनतम Technology आहे. त्यामुळे या टेक्नॉलॉजी चा वापर भविष्यात सर्व Smartphone सोबतच Tablets, Laptops अशा इलेक्ट्रोनिक Gadgets मध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीचे फायदे कोणते आहेत ?
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीचे फायदे हे खालीलप्रमाणे आहेत.
- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मध्ये Advance Technology चा वापर केला गेला आहे, यामुळेच Regular फिंगरप्रिंट सेंसर पेक्षा In-Display Fingerprint Sensor हा अधिक गतीने Unlock होतो.
- Smartphone मधील Fingerprint Sensor ची जागा In-Display Fingerprint Sensor ने घेतल्यामुळे आपल्याला पहिल्यापेक्षा अधिक मोठी Screen Size पाहायला मिळते.
- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर हा Advance Technology वर Based असल्यामुळे या सेंसर ची Original व Fake फिंगरप्रिंट ओळखण्याची क्षमता ही जास्त चांगली असुन हा सेंसर अधिक गतीने Fingerprint ओळखु शकतो.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीचे तोटे कोणते आहेत ?
म्हणतात ना कि नाण्याला दोन बाजू असतात!! अगदी त्याचप्रमाणे या Technology च्या देखील दोन बाजू आहेत म्हणजेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर या Technology च्या खुप साऱ्या फायद्यांसोबतच काही तोटे पण आहेत, फायदे कोणते-कोणते आहेत ते आपण वरती बघितले आहेतच आता आपण तोटे कोणते आहेत ते बघुयात.
- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर हा Smartphone Screen च्या आतमध्ये असल्यामुळे जेंव्हा तुमच्या Smartphone ची Screen फुटते तेंव्हा त्या स्क्रिन सोबतच त्यातील In-Display Fingerprint Sensor देखील खराब होतो. त्यामुळे त्याचा दुरुस्ती खर्च देखील खुप जास्त येतो.
- स्मार्टफोन Unlock करतेवेळी जर तुमचे Finger साधारण ओले किंवा पुर्ण ओले असेल तर तुमचा स्मार्टफोन अनलॉक होवू शकणार नाही. तुम्हाला तुमचे Finger कोरडे करुनच Smartphone अनलॉक करावा लागेल.
निष्कर्ष
मी आशा करतो कि या Article द्वारे तुम्हाला समजले असेल कि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी काय आहे ? यामध्ये मी तुम्हाला अत्यंत सरळ व सोप्या पद्धतीने “In-Display Fingerprint Sensor” याविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्हाला सर्वकाही अत्यंत चांगल्या प्रकारे समजले असेल अशी मला अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त तुमच्या जर या Article विषयी काही शंका असतील तर नि:संकोच आम्हाला Comment करुन कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर आपल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करु.
तसेच तुमचा या Article विषयीचा अमुल्य अभिप्राय आम्हाला Comment करुन नक्किच कळवा. आम्हाला आपला अभिप्राय वाचताना आनंदच होईल, धन्यवाद !!