“स्वरचक्र मराठी” ॲप काय आहे ? Swarachakra Marathi App ?

Homeउपयोगी ॲप्स“स्वरचक्र मराठी” ॲप काय आहे ? Swarachakra Marathi App ?

स्वरचक्र मराठी हे एक असे App आहे जे आपल्याला Mobile मध्ये मराठी भाषेमध्ये Typing करण्यास मदत करते. जसे तुम्ही Mobile मध्ये English Typing करता अगदी त्याचप्रमाणे आपण “स्वरचक्र मराठी” या App चा वापर करुन मराठी भाषेमध्ये Typing करु शकतो. हे App आपल्याला विनामूल्य एक Virtual Keyboard उपलब्ध करुन देते कि ज्यामुळे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये Fast Typing करु शकतो.

Swarachakra Marathi हे App सर्वप्रथम 7 जून 2013 रोजी Android वापरकर्त्यांसाठी Internet वर Initially Release करण्यात आले. हे ॲप “IDIN Group” यांनी Develop केले असून ते App हिंदी, कोकणी, कन्नड, पंजाबी अश्या अनेक भारतीय भाषांमध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. Google Play Store वर या App ला लोकांनी 20 लाखांपेक्षाही जास्त वेळा Download केले आहे, यावरुन तुम्ही हे App किती महत्त्वाचे आहे याची कल्पना करु शकता.

स्वरचक्र मराठी ॲप का वापरले पाहिजे ?

स्वरचक्र मराठी ॲप आपण का वापरले पाहिजे याची कारणे हि खालीलप्रमाणे आहेत.

  • Swarachakra Marathi App च्या माध्यमातुन आपण Android Smartphone मध्ये मराठी भाषेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने Typing करु शकतो.
  • या App मध्ये आपल्याला Typing करण्यासाठी दोन भाषांचा पर्याय आहे आणि त्या म्हणजे Marathi व English. आपण आपल्या सोयीनूसार आपल्याला हवी ती भाषा निवडून Typing करु शकतो.
  • स्वरचक्र मराठी हे App अश्या पद्धतीने Design केले गेले आहे कि ज्यामुळे वापरकर्त्याला अत्यंत जलदगतीने विनाअडथळा Marathi Typing करता येवू शकेल.
  • या Application मध्ये अनेक प्रकारची उपयोगी Settings वापरकर्त्यांना उपलब्ध करुन दिलेली आहेत म्हणजेच Keyboard ची Size कमी जास्त करता येते, एका Mobile मधुन दुसऱ्या Mobile मध्ये Typing करता येते तसेच या App मध्ये आपल्याला Typing Game देखील खेळता येते.

Swarachakra Marathi ॲप डाउनलोड कसे करावे ?

स्वरचक्र मराठी ॲप तुम्ही अनेक प्रकारे डाउनलोड करु शकता. हे Application विनामुल्य असल्यामुळे अगदी सहजपणे आपल्याला Internet वर मिळू शकते.

प्ले स्टोअर

Play Store हा एक असा Platform आहे कि ज्यावरती आपल्याला अनेक प्रकारची Mobile उपयोगी Applications विनामुल्य तसेच विकत मिळू शकतात. यावरती स्वरचक्र मराठी हे App विनामुल्य आहे. ते तुम्ही Download करुन तुमच्या Mobile मध्ये त्याचा वापर करु शकता.

Search Term – Swarachakra Marathi App

इंटरनेट

Internet वरती तुम्ही आजपर्यंत खुप सारी माहिती Search केली असेल व त्याचा तुम्हाला Result देखील मिळाला असेल. अगदी त्याचपद्धतीने तुम्ही Internet वर “Swarachakra Marathi” असे Search करु शकता, काही सेकंदातच तुमच्या समोर या App ची Download link असणाऱ्या Websites दिसायला लागतील.

Search Term – Swarachakra Marathi App

स्वरचक्र मराठी ॲप Install कसे करावे ?

स्वरचक्र मराठी ॲप Install करणे अगदीच सोपे आहे. तुम्ही हे ॲप तुमच्या Smartphone मध्ये अत्यंत कमी वेळात Install करु शकता. तुमच्या Mobile मध्ये स्वरचक्र मराठी ॲप Install करण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या Steps Follow करु शकता.

  1. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या Mobile वर Play Store App ओपन करायला पाहिजे.
  2. त्यानंतर तुम्हाला Play Store वर, “Swarachakra Marathi” असे Search करायला हवे.
  3. समोर दिसत असणाऱ्या Swarachakra Marathi ॲपच्या Install बटणावर तुम्हाला Click करायचे आहे.
  4. जसे कि तुम्ही आता Swarachakra Marathi ॲप तुमच्या Mobile वर Install केले आहे.

स्वरचक्र मराठी ॲप Activate कसे करावे ?

  1. आता तुम्ही हे ॲप तुमच्या Mobile मधुन Open करा. ॲप Open केल्यानंतर तुमच्या समोर मराठी भाषेमध्ये एक वाक्य दिसेल ते म्हणजे “आपला फोन हे वाक्य मराठीत व्यवस्थित दाखवत आहे काय?”
  2. वरील वाक्य जर तुमच्या Mobile मध्ये व्यवस्थित दिसत असल्यास तुम्ही तुमच्या Mobile Screen च्या खालील उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या “हो,ठीक आहे” या बटणावर Click करा.
  3. स्वरचक्र वापरण्यास सुरुवात करण्याआधी त्याला एनेबल व डीफॉल्ट बनवावे लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या Smartphone वर दिसत असणाऱ्या “स्वरचक्र एनेबल करा” या बटणावर Click करायला पाहिजे.
  4. क्लिक केल्यानंतर स्वरचक्र मराठी ॲप तुम्हाला तुमच्या Mobile च्या Setting Menu मध्ये Redirect करेल.
  5. आता तुम्हाला समोर दिसत असणाऱ्या “स्वरचक्र मराठी” या बटणावर Click करुन त्याला तुम्ही On करा व समोर दिसत असणाऱ्या Activate बटणावर Click करा.
  6. त्यानंतर Swarachakra Marathi App Open करुन “स्वरचक्रला डीफॉल्ट बनवा” या बटणावर Click करा.
  7. आता स्वरचक्र मराठी हे ॲप डिफॉल्ट Typing Keyboard म्हणून तुमच्या Mobile मध्ये Set झाले आहे, तुम्ही आता या ॲपच्‍या माध्यमातुन मराठी भाषेमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने जलद गतीने Typing करु शकता.

स्वरचक्र मराठी ॲप चा वापर कसा करावा ?

स्वरचक्र मराठी या ॲप चा वापर करुन तुम्ही मराठी Typing कसे करु शकता हे तुम्हाला समोरील उदाहरणावरुन समजून येईल. उदाहरणार्थ – समजा मला जर “टेक्निक” हा शब्द Type करायचा असेल तर तो आपण खालील पद्धतीने Type करु शकतो.

  1. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला “ट” या अक्षराला प्रेस करुन धरायचे आहे.
  2. त्यानंतर आपल्यासमोर ट मधील सर्व अक्षरे वर्तुळाकार स्वरुपात आपल्या समोर दिसतील जसे कि ट, टा, टि, टी, टु, टू, टे, टै, टो, टौ, ट्. यातील आपण आपल्याला हवे असणारे “टे” हे अक्षर वर्तुळातून निवडून घेवू.
  3. मग आपण “क” या अक्षराला प्रेस करुन वर्तुळातून “क्” हे अक्षर Select करु. त्यानंतर आपण “क्न” या अक्षराला प्रेस करुन “क्नि” हे अक्षर निवडू.
  4. आता आपला “टेक्निक” या शब्दातील “टेक्नि” पर्यंत शब्द तयार झाला आहे, आता फक्त “क” हे अक्षर राहिले आहे.
  5. त्यानंतर आपण “क” या अक्षरावर प्रेस करुन वर्तुळातून “क” हे अक्षर निवडून घेवू. अशा पद्धतीने आपला “टेक्निक” हा शब्द यशस्वीरित्या तयार झालेला आहे.

स्वरचक्र मराठी ॲप हे वापरण्यास अत्यंत सरळ व सोपे आहे. तुम्ही सहजरित्या हे ॲप हाताळू शकता. या ॲप मध्ये आपण Keyboard चा आकार देखील आपण आपल्या सोईनूसार कमी-जास्त करु शकतो. म्हणजेच यामध्ये 3 प्रकारच्या साईजमध्ये आपल्याला Virtual Keyboard असलेला पाहायला मिळतो, तो म्हणजे चिरेबंदी, मोठा व छोटा.

चिरेबंदी प्रकारामध्ये आपल्याला साधारणता 6 प्रकारच्या साईजचे Keyboard बघायला मिळतात त्यामुळे आपण आपल्या गरजेनूसार Keyboard ची Size बदलू शकतो.

निष्कर्ष

स्वरचक्र मराठी हे ॲप Develop करताना Developers नी यातील लहान-लहान गोष्टींवर अत्यंत बारकाईने काम केले आहे, त्यामुळे हे ॲप वापरण्यास अत्यंत User Friendly आहे. तुम्ही जेंव्हा या ॲप चा वापर करुन Typing कराल तेंव्हा तुम्हाला समजून जाईल.

या Article द्वारे तुम्हाला समजले असेल कि स्वरचक्र मराठी ॲप काय आहे ? यामध्ये मी तुम्हाला अत्यंत सरळ व सोप्या पद्धतीने “स्वरचक्र मराठी” चा वापर कसा करावा याविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हाला सर्वकाही अत्यंत चांगल्या प्रकारे समजले असेल अशी मला अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त तुमच्या जर या Article विषयी काही शंका असतील तर नि:संकोच आम्हाला Comment करुन कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर आपल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करु.

तसेच तुमचा या Article विषयीचा अमुल्य अभिप्राय आम्हाला Comment करुन नक्किच कळवा. आम्हाला आपला अभिप्राय वाचताना आनंदच होईल, धन्यवाद !!

Rohit Patil
Rohit Patilhttps://TechnicalKida.com/
नमस्कार मित्रांनो, मी रोहित पाटील, टेक्निकल किडा या वेबसाईट चा Founder आणि Author आहे. शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर, मी Geoinformatics (GIS & Remote Sensing) या विषयातून Diploma चे शिक्षण पुर्ण केले आहे, तसेच मी सध्या MBA (Production and Operations Management) चे शिक्षण घेत आहे. Geoinformatics या विषयातून Diploma चे शिक्षण घेत असतांनाच मला Web Development, कॉम्प्युटर, Latest Technology, इंटरनेट, GIS & Remote Sensing, बँकिंग, स्मार्टफोन्स, सोशल मीडीया टिप्स व Digital Marketing या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगलीच रुची निर्माण झाली होती. यामुळे मी असा निर्णय घेतला कि या ब्लॉग च्या मदतीने आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्या सर्वांना या सगळ्या विषयांबद्दल सर्वोत्तम असे मार्गदर्शन करु शकतो. मला आता Technology संबंधित वेग-वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात व माझ्या वाचकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

नवीन पोस्ट

 alt=

Subscribe to Our Newsletter

टेक्निकल किडा या वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व नवीन पोस्ट च्या सूचना सर्वात पहिल्यांदा तुमच्या ई-मेल वर मिळविण्यासाठी, तुमचा ई-मेल आयडी टाईप करुन Subscribe या बटणावर क्लिक करा.

Subscribe us on Youtube