MahaDBT Scholarship ऑनलाईन Redeem कशी करावी ?

HomeइंटरनेटMahaDBT Scholarship ऑनलाईन Redeem कशी करावी ?

ज्या विद्यार्थ्यांनी MahaDBT Scholarship साठी Mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर Online अर्ज केला होता व त्या अर्जाच्या सर्व प्रती या संबंधीत कॉलेज मध्ये जमा केल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना एक Message आला असेल कि तुम्ही Online तुमची MahaDBT Scholarship Redeem करा. ज्यांना हा मेसेज आला आहे त्यांना Redeem बटणावर Click करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्या विद्यार्थ्यांना MahaDBT Scholarship चा फायदा होणार नाही.

MahaDBT Scholarship Redeem करणे म्हणजे काय ?

MahaDBT Scholarship हि महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती आहे. जे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील तेच विद्यार्थी MahaDBT Scholarship साठी Online अर्ज करु शकतात. Online अर्ज केल्यानंतर या अर्जाच्या प्रती विद्यार्थ्यांना आपल्या College मध्ये जमा कराव्या लागतात.

या सर्व Steps Follow केल्यानंतर व या अर्जाला शासनाकडून Approval मिळाल्यानंतर आपल्याला एक E-Mail किंवा Text Message येतो. त्यामध्ये असे लिहीलेले असते कि, MahaDBT Scholarship चा लाभ मिळवण्यासाठी Online Login करुन Redeem या बटणावर Click करा. जेणेकरुन शासनाकडून निश्चित केलेली रक्कम तुमच्या Bank Account मध्ये Transfer केली जाईल.

MahaDBT शिष्यवृत्ती Redeem कशी करावी ?

MahaDBT Scholarship Redeem करणे खुपच सोपे आहे, तुम्ही खालील Steps Follow करुन थोड्याच वेळात तुमची Scholarship Redeem करु शकता.

  1. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  2. त्यानंतर वेबसाईटच्या उजव्या साईटला असणाऱ्या “Post Matric Scholarship” या Option वरती Click करायचे आहे.
  3. आता “Applicant Login” या बटणावरती Click करुन User Name व Password टाइप करा आणि “Login Here” या बटणावरती Click करा.
  4. “My Applied Scheme” मध्ये Click करुन “Approved Application” मध्ये जा.
  5. त्यानंतर तुम्हाला “Check Redeem Status” यावरती Click करायचे आहे.
  6. आता तुम्ही Redeem या बटणावरती Click करण्यासाठी सज्ज झाला आहात. समोर दिसत असणाऱ्या “Redeem” या बटणावर Click करा.
  7. MahaDBT ‍शिष्यवृत्तीसाठी आता तुम्ही यशस्वीपणे “Redeem” केले आहे, थोड्याच दिवसात तुम्हाला तुमची शिष्यवृत्तीची रक्कम तुमच्या Bank Account वरती जमा झालेली दिसेल.

Redeem बटणावर Click करणे का गरजेचे आहे ?

Redeem या बटणावर Click करणे खुप गरजेचे आहे कारण जर आपण Redeem बटणावरती Click केले नाही, तर आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून मिळणारी जी शिष्यवृत्ती आहे ती मिळणार नाही. तुम्हाला ठरवून दिलेल्या वेळेत तुम्ही जर Redeem बटणावरती Click केलेत तरच तुम्हाला तुमची शिष्यवृत्तीची रक्कम तुमच्या Bank Account मध्ये शासनाकडून जमा होईल.

तुम्हाला आता प्रश्न पडला असेल कि Redeem बटण ठेवण्याचा फायदा काय? Redeem बटण ठेवण्यामागचा MahaDBT Portal चा हेतु आहे Security आणि तुमचे Bank Account नंबर Confirmation.

जेंव्हा तुम्हाला Redeem बटणावर Click करण्यासाठी सांगितले जाते तेंव्हा Screen च्या समोर तुमचा Bank Account नंबर चे शेवटचे चार अंक जे असतील ते दर्शवले जातात. जेणेकरुन तुमचा Bank Account नंबर तो आहे का ते तुम्ही Confirm करु शकता. तुम्ही MahaDBT Scholarship चा Online फॉर्म भरतेवेळी तुमचा जो आधार कार्ड नंबर दिलेला असणार आहे त्या आधार कार्ड ला जो Bank Account नंबर लिंक असेल तोच Bank Account नंबर तुम्हाला Redeem करताना Screen समोर दिसेल.

Redeem बटण दिसत नसेल तर काय करावे ?

सगळ्यात पहिल्यांदा आपण Redeem बटण न दिसण्याची कारणे कोणती आहेत ती पाहूयात.

  1. Bank Account ला Aadhar Card लिंक नसेल तर.
  2. Aadhar Card ला आपला Mobile नंबर लिंक नसेल तर.
  3. तुम्ही जर अपुर्ण कागदपत्रे College मध्ये जमा केली असतील तर.

वरीलपैकी एकही Process तुमच्याकडून करायची राहिली असेल तर तुमचा Form Pending मध्ये राहतो व जोपर्यंत तुम्ही ती Process पुर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला Redeem बटण दिसत नाही.

आता आपण बघुयात कि Redeem बटन दिसण्यासाठी आपण काय केले पाहिजे.

  1. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या Bank Account ला Aadhar Card लिंक आहे का ते पाहा, लिंक नसेल तर बँकेत जावून Bank Account ला Aadhar Card लिंक करुन घ्या. तुम्ही https://resident.uidai.gov.in/bank-mapper या वेबसाईटवर जावून देखील Aadhar Bank Linking Status चेक करु शकता.
  2. त्यानंतर तुम्ही Aadhar Card ला आपला Mobile नंबर लिंक आहे का ते बघुन नसेल तर लिंक करुन घ्या. तसेच https://resident.uidai.gov.in/verify-email-mobile या वेबसाईटवर जावून देखील तुम्ही Online चेक करु शकता.

वरील सर्व Steps तुमच्या पुर्ण झालेल्या असतील व तरीदेखील तुम्हाला Redeem बटण दिसत नसेल, तर तुम्ही College मध्ये जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये मध्ये काहितरी Problem असु शकतो, त्यामुळे College मध्ये जावून तुम्ही जमा केलेली कागदपत्रे एकदा चेक करुण घेवू शकता.

MahaDBT Scholarship विषयीचे तुमचे FAQs

  • माझ्याकडे अनेक Bank Accounts आहेत, तर माझे शिष्यवृत्तीचे पैसे कोणत्या Bank Account ला जमा होतील ?

समजा तुमच्याकडे 3 ते 4 Bank Account असतील तर त्यातील सगळ्यात शेवटी ज्या Bank Account ला तुम्ही तुमचे Aadhar Card लिंक केले असेल त्या Account मध्ये तुमची MahaDBT ची शिष्यवृत्ती जमा होईल.

तुम्हाला तुमची MahaDBT ची शिष्यवृत्ती ज्या बँकेमध्ये जमा केली जावी असे वाटत असेल, त्या बँकेत जावून तुमच्या Bank Account ला Aadhar Card लिंक करण्यासाठी तुम्ही बँकेकडे लेखी अर्ज करु शकता. त्या अर्जामध्ये तुम्ही तुमचा Bank Account नंबर, Aadhar Card नंबर तसेच तुमचा Mobile नंबर लिहून तो अर्ज बँकेमध्ये जमा करा. थोड्याच दिवसात तुमच्या Bank Account ला Aadhar Card नंबर लिंक होईल.

  • माझ्या बँक खात्यात डीबीटी निधी आला आहे हे मला कसे कळेल ?

तुमचा Mobile नंबर जर तुमच्या Bank Account सोबत लिंक असेल तर ज्यावेळी तुमच्या बँक खात्यामध्ये MahaDBT कडून निधी पाठवला जाईल, तेंव्हा तुम्हाला तुमच्या Mobile नंबर वर बँकेचा एक SMS येईल कि तुमच्या Account मध्ये ठरावीक रक्कम जमा केली आहे असा.

जर तुमचा Mobile नंबर तुमच्या Bank Account सोबत लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत जावून Mobile नंबर लिंक करावा लागेल, त्यानंतरच तुम्हाला बँकेकडून SMS अलर्ट येतील.

तसेच तुम्हाला बँकेत जावून पासबुक भरुन देखील कळू शकते कि तुमच्या Account मध्ये निधी आला आहे का नाही.

  • Aadhar-Bank Linking Status कसा चेक करावा ?

तुम्हाला ज्या Mobile नंबर चा Aadhar Bank Linking Status चेक करावयाचा आहे त्या Mobile नंबर वरुन *99*99# हा नंबर Dial करायचा आहे. तुम्हाला लगेचच Aadhar Bank Linking Status स्क्रिन वर Display होईल.

तुम्ही Online देखील Aadhar Bank Linking Status चेक करु शकता. त्यासाठी तुम्हाला https://resident.uidai.gov.in/bank-mapper या वेबसाईला भेट द्यायला हवी.

  • Redeem केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची ?

MahaDBT Portal वर Login करुन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करु शकता. त्यासाठी तुम्हाला “My Applied Scheme” या मेन्यू वरती Click करुन त्यानंतर “Approved Application” मध्ये जावून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासु शकता.

निष्कर्ष

मी आशा करतो कि या Article द्वारे तुम्हाला समजले असेल कि MahaDBT Scholarship ऑनलाईन Redeem कशी करावी ? यामध्ये मी तुम्हाला अत्यंत सरळ व सोप्या पद्धतीने MahaDBT Portal चा वापर कसा करावा व Scholarship Redeem कशी करावी याविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

माझी तुम्हा सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती आहे कि हा लेख तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्र-मंडळींना, नातेवाइकांना तसेच तुमच्या प्रियजनांसोबत Social Media वर जरुर शेअर करा. जेणेकरुन त्यांनादेखील MahaDBT Scholarship ऑनलाईन Redeem कशी करावी ? याविषयी अधिक माहिती मराठी भाषेमध्ये मिळू शकेल.

तसेच तुमचा या Article विषयीचा अमुल्य अभिप्राय आम्हाला Comment करुन नक्किच कळवा. आम्हाला आपला अभिप्राय वाचताना आनंदच होईल, धन्यवाद !!

Rohit Patil
Rohit Patilhttps://TechnicalKida.com/
नमस्कार मित्रांनो, मी रोहित पाटील, टेक्निकल किडा या वेबसाईट चा Founder आणि Author आहे. शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर, मी Geoinformatics (GIS & Remote Sensing) या विषयातून Diploma चे शिक्षण पुर्ण केले आहे, तसेच मी सध्या MBA (Production and Operations Management) चे शिक्षण घेत आहे. Geoinformatics या विषयातून Diploma चे शिक्षण घेत असतांनाच मला Web Development, कॉम्प्युटर, Latest Technology, इंटरनेट, GIS & Remote Sensing, बँकिंग, स्मार्टफोन्स, सोशल मीडीया टिप्स व Digital Marketing या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगलीच रुची निर्माण झाली होती. यामुळे मी असा निर्णय घेतला कि या ब्लॉग च्या मदतीने आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्या सर्वांना या सगळ्या विषयांबद्दल सर्वोत्तम असे मार्गदर्शन करु शकतो. मला आता Technology संबंधित वेग-वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात व माझ्या वाचकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

नवीन पोस्ट

 alt=

Subscribe to Our Newsletter

टेक्निकल किडा या वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व नवीन पोस्ट च्या सूचना सर्वात पहिल्यांदा तुमच्या ई-मेल वर मिळविण्यासाठी, तुमचा ई-मेल आयडी टाईप करुन Subscribe या बटणावर क्लिक करा.

Subscribe us on Youtube