ई-श्रम कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

Homeइंटरनेटई-श्रम कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

नमस्कार मित्रांनो, आज आपण ई-श्रम कार्डसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करावा, ई-श्रम कार्ड म्हणजे काय तसेच ई-श्रम कार्डचे लाभ कोणते-कोणते आहेत या सर्व गोष्टींची माहिती आज या लेखामध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत.

ई-श्रम कार्ड म्हणजे काय ?

श्रम व रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी असंघटीत क्षेत्रातील कामगार व मजुरांसाठी ई-श्रम कार्ड ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा असंघटीत क्षेत्रातील मजुर व कामगारांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळावा हा आहे. ई-श्रम कार्डसाठी 18 वयोगटापासून पुढील नागरीक अर्ज करु शकतात.

आजअखेर 22 करोड कामगारांना ई-श्रम कार्ड दिले गेले आहे आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. ई-श्रम कार्डच्या माध्यमातुन भविष्यामध्ये सरकार रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करुन देवु शकते. त्यामुळे तुम्ही जर मजुर किंवा कामगार असाल तर नक्किच तुम्ही ई-श्रम कार्डसाठी अर्ज करु शकता.

E-Shram कार्डचे फायदे कोणते आहेत ?

  • ई-श्रम कार्ड च्या माध्यमातुन नोंदणीकृत मजुर व कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. त्यासाठी कोणतेही प्रिमियम भरण्याची आवश्यकता नाही.
  • अपघातामध्ये मृत्यू आल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो.
  • तसेच अंशत: अपंगत्व आल्यास सरकारकडुन 1 लाख रुपये मिळू शकतात.
  • ई-श्रम कार्डच्या माध्यमातुन सर्व मजुर व कामगारांचा डेटाबेस तयार केला जातो.
  • त्यामुळे आपत्ती ‍किंवा महामारी सारख्या काळात मजुर व कामगारांना सरकारी मदत मिळणे सोपे होते.

ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी कोण ऑनलाईन अर्ज करु शकतो ?

ई-श्रम कार्ड ‍मिळवण्यासाठी खालील नागरीक ऑनलाईन अर्ज करु शकतात.

घरगुती कामगार लेबलिंग कामगार बांधकाम कामगार पशुपालन करणारे
विडी कामगार हातगाडी ओढणारे कॉम्प्युटर ऑपरेटर आशा सेविका
वीटभट्टीवरील मजुर सेंट्रिंग कामगार लेदर कामगार ऑटो रिक्षा चालक
अल्पभुधारक शेतकरी भाजीपाला विक्रेते मनरेगा कामगार स्थलांतरित कामगार
न्हावी शेतमजूर सुतार फळ विक्रेते
वृत्तपत्र विक्रेते CSC केंद्रचालक घरकाम करणारे दूध उत्पादक शेतकरी

E-Shram कार्डसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ?

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी खालील कगदपत्रांची आवश्यकता आहे.

शैक्षणिक प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचा दाखला
मोबाईल क्रमांक आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे. वयाचा पुरावा
बचत खाते क्रमांक आधार क्रमांक बँक पासबुक वरिल IFSC कोड

ई-श्रम कार्डसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

ई-श्रम कार्ड मिळविण्याकरीता अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तुमच्या आधार कार्ड ला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही अगदी काही ‍मिनिटांतच ऑनलाईन ई-श्रम कार्ड काढु शकता, त्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फोलो करा.

  1. ई-श्रम कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या ब्राउजर मध्ये https://eshram.gov.in हि वेबसाईट ओपन करुन घ्या.
  2. त्यानंतर तुमच्या समोर वेबपेज ओपन झालेले दिसेल, आता ‘Register on e-shram’ या ऑप्शन वरती क्लिक करा.
  3. आता तुमच्यासमोर Self-Registration नावाचे पेज ओपन झालेले दिसेल, यामध्ये पहिल्यांदा तुम्ही तुमचा Aadhaar linked mobile number टाईप करुन घ्या.
  4. त्यानंतर Enter Captcha या ऑप्शन मध्ये कॅप्चा कोड टाईप करा.
  5. तुम्हाला आता EPFO व ESIC या ऑप्शन्स मध्ये ‘No’ या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
  6. त्यानंतर Send OTP या बटणावरती क्लिक करा.
  7. आता तुमच्यासमोर पुढचे पेज उघडलेले दिसेल, तुमच्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल तो OTP तुम्हाला ‘Enter OTP’या ऑप्शन मध्ये टाईप करुन ‘Submit’ बटणावरती Click करावयाचे आहे.
  8. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करा व कॅप्चा कोड टाईप करुन ‘I Agree’ या ऑप्शन वरती क्लिक करा आणि नंतर ‘Submit’ या बटणावरती क्लिक करा.
  9. आता तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर वरती OTP येईल तो OTP ‘Enter OTP’ या ऑप्शन मध्ये टाईप करुन ‘Validate’ या पर्यायावरती क्लिक करा.
  10. त्यानंतर तुमच्या समोर ‘Personal Information’ नावाचा टॅब ओपन झालेले दिसेल.
  1. यामध्ये तुम्ही तुमचा Emergency Mobile Number, Email ID, Marital Status, Father Name, Social Category, Blood Group, Differently Abled or Not या सर्व गोष्टी व्यसस्थित टाईप करुन घ्या.
  2. त्यानंतर Nominee Details या ऑप्शन मध्ये Nominee Name, Nominee Date of Birth, Gender, Relationship with you इत्यादी गोष्टी टाईप करा आणि Save & Continue या बटणावरती Click करा.
  3. आता तुमच्यासमोर Address टॅब ओपन झालेला दिसेल, त्यामध्ये तुम्ही तुमचा Residentials Details टाईप करुन घ्या जसे कि, Home/Native State, Home/Native District, Tehsil, Pin code आणि त्यानंतर Save & Continue बटणावरती Click करा.
  4. त्यानंतर तुमच्यासमोर Education Qualification चा टॅब दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे Highest Education Qualification सिलेक्ट करायचे आहे व तुमची दर महिन्याची मिळकत किती आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि नंतर Save and Continue बटणावरती Click करायचे आहे.
  5. आता तुम्हाला Occupation and Skills नावाचा टॅब दिसेल कि ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही कोणते काम करता त्याविषयी माहिती भरायची आहे जसे कि Primary Occupation, Secondary Occupation तसेच तुम्हाला या क्षेत्रामध्ये किती वर्षांचा अनुभव आहे आणि Save बटणावरती क्लिक करायचे आहे.
  6. त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स भरायची आहे त्यामध्ये बँक अकाऊंट नंबर, तुमचे नाव तसेच IFSC code टाईप करुन Search चिन्हावरती क्लिक करायचे आहे.
  7. सर्च चिन्हावरती Click केल्यानंतर तुमच्या बँकेचे शाखेचे नाव ऑटोमॅटिक तुमच्या स्क्रिनसमोर दिसेल त्यानंतर Save and Continue या बटणावरती Click करा.
  8. आता तुमच्या समोर तुम्ही भरलेला सर्व फॉर्म दिसेल, जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही हा फॉर्म Edit बटणावरती Click करुन त्यामध्ये आवश्यक तो बदल करु शकता आणि जर तुमचा फॉर्म बरोबर असेल तर तुम्ही Submit या बटणावरती Click करा.
  9. स्क्रिनवर तुम्हाला आता तुमचे E-Shram कार्ड दिसेल, हे कार्ड तुम्ही Print देखील करु शकता किंवा Download देखील करु शकता.

ई-श्रम कार्ड विषयीचे तुमचे FAQs

  • आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे काय ?

तुमच्या आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल वरुन ई-श्रम कार्डसाठी अर्ज करु शकता, अन्यथा तुम्हाला CSC केंद्रामध्ये जावून ई-श्रम कार्डसाठी अर्ज करावा लागेल. तुमच्या आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे कि नाही याची सद्यस्थिती चेक करण्यासाठी पुढील वेबलिंक ओपन करा – https://myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile

  • UAN क्रमांक म्हणजे काय आहे ?

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर प्रत्येक असंघटित कामगाराला एक 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिला जातो त्यालाच UAN असे म्हणतात. UAN क्रमांक हा कायमस्वरूपी क्रमांक असतो म्हणजे एकदा नियुक्त केल्यानंतर, तो त्या कामगाराच्या ई-श्रम कार्डवर आयुष्यभर सारखाच राहील.

  • ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी काही पात्रता निकष आहे का ?

कोणताही कामगार जो असंघटीत क्षेत्रातील आहे आणि जो 16 ते 59 वयोगटातील आहे असा प्रत्येक भारतीय नागरीक ई-श्रम कार्ड काढण्यासाठी पात्र असेल.

  • ई-श्रम कार्डची वैधता किती कालावधीसाठी असेल ?

ई-श्रम कार्ड हे आयुष्यभरासाठी वैध असेल.

  • ई-श्रम कार्डचे नूतनीकरण करावे लागेल का ?

कामगारांना त्यांचा मोबाईल नंबर, वर्तमान पत्ता व अन्य तपशील इत्यादी नियमितपणे अपडेट करण्यासाठी ई-श्रम कार्डचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यांचे खाते सक्रिय ठेवण्यासाठी, त्याने/तिने वर्षातून किमान एकदातरी त्यांचे खाते अपडेट करणे आवश्यक आहे.

निष्कर्ष

आज आपण या लेखामध्ये बघितले कि ई-श्रम कार्ड म्हणजे काय, ई-श्रम कार्डचे फायदे कोणते आहेत, हे कार्ड काढण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे तसेच हे कार्ड काढण्यासाठी कोण पात्र असेल व ई-श्रम कार्डसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा.

मला आशा आहे कि तुम्हाला या लेखामधुन ई-श्रम कार्डविषयीच्या तुमच्या सर्व शंकांचे समाधान झाले असेल, या लेखामध्ये उल्लेख केल्या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर निसंकोचपणे तुम्ही खालील कमेंट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारु शकता. आम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देताना आनंदच होईल.

तसेच तुम्हाला जर ‘ई-श्रम कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?’ हा लेख आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत नक्किच शेअर करा. धन्यवाद !!

Rohit Patil
Rohit Patilhttps://TechnicalKida.com/
नमस्कार मित्रांनो, मी रोहित पाटील, टेक्निकल किडा या वेबसाईट चा Founder आणि Author आहे. शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर, मी Geoinformatics (GIS & Remote Sensing) या विषयातून Diploma चे शिक्षण पुर्ण केले आहे, तसेच मी सध्या MBA (Production and Operations Management) चे शिक्षण घेत आहे. Geoinformatics या विषयातून Diploma चे शिक्षण घेत असतांनाच मला Web Development, कॉम्प्युटर, Latest Technology, इंटरनेट, GIS & Remote Sensing, बँकिंग, स्मार्टफोन्स, सोशल मीडीया टिप्स व Digital Marketing या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगलीच रुची निर्माण झाली होती. यामुळे मी असा निर्णय घेतला कि या ब्लॉग च्या मदतीने आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्या सर्वांना या सगळ्या विषयांबद्दल सर्वोत्तम असे मार्गदर्शन करु शकतो. मला आता Technology संबंधित वेग-वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात व माझ्या वाचकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

नवीन पोस्ट

 alt=

Subscribe to Our Newsletter

टेक्निकल किडा या वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व नवीन पोस्ट च्या सूचना सर्वात पहिल्यांदा तुमच्या ई-मेल वर मिळविण्यासाठी, तुमचा ई-मेल आयडी टाईप करुन Subscribe या बटणावर क्लिक करा.

Subscribe us on Youtube