Bootable Pen Drive कसा बनवायचा ?

Homeकॉम्प्युटरBootable Pen Drive कसा बनवायचा ?

मित्रांनो, आज आपण Booting म्हणजे काय, Bootable Pen Drive चे फायदे कोणते आहेत तसेच Bootable पेन ड्राईव कसा बनवायचा याविषयाशी निगडित सर्व गोष्टींची माहिती या लेखामध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत.

Booting म्हणजे काय ?

जेंव्हा आपण आपला कॉम्प्युटर चालु करतो तेंव्हा कॉम्प्युटर Automatic काही प्रक्रिया करायला सुरुवात करतो, याच प्रक्रियेला ‘Booting’ असे म्हणतात.

संगणकामध्ये Booting हि संगणक चालु करण्याची प्रक्रिया आहे. Booting हि प्रक्रिया तेंव्हा चालु होते जेंव्हा आपण संगणकाचे फिजीकली अस्तित्वात असणारे बटन प्रेस करतो किंवा Software च्या माध्यमातुन एखादी कमांड Run करतो. हे बटन चालु केल्यानंतर, Computer च्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमधील मुख्य मेमरीमध्ये कोणतेही सॉफ्टवेअर नसते त्यामुळे कोणतेही प्रक्रिया कार्यान्वित करण्यापुर्वी मेमरीमध्ये Software लोड करणे आवश्यक असते. मेमरीमध्ये OS Software लोड करण्यासाठी Bootable Pen Drive किंवा Bootable डिस्क ची गरज असते. म्हणुनच Bootable पेन ड्राईव कसा बनवायचा याविषयी आपण या Article मध्ये बघणार आहोत.

Bootable Pen Drive चे फायदे कोणते आहेत ?

  • काहि कारणास्तव तुमचा Computer किंवा Laptop जर Crash झाला, तर त्यासोबतच तुमच्या कॉम्प्युटर किंवा लेपटॉप मधील Install केलेली Operating System देखील डिलीट होते आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या Computer किंवा Laptop चा पहिल्यासारखा वापर करु शकत नाही. अश्या वेळी तुमच्या जवळ जर Bootable Pen Drive असेल तर तुम्ही नवीन Operating System तुमच्या कॉम्प्युटर किंवा लेपटॉप मध्ये Install करु शकता व तुम्ही तुमचे काम पहिल्यासारखे करु शकता.
  • Bootable Pen Drive च्या मदतीने तुम्ही तुमचा संगणक Live Boot देखील करु शकता.

Bootable पेन ड्राईव बनविण्यासाठी कोण-कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ?

Bootable पेन ड्राईव बनविण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते.

पेन ड्राईव

बुटेबल पेन ड्राईव बनविण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 8 GB स्टोरेज क्षमतेचा चा Pen Drive असणे गरजेचे आहे.

Rufus सॉफ्टवेअर

तुमच्याकडे Rufus सॉफ्टवेअर असणे असणे गरजेचे आहे. तुम्ही Rufus सॉफ्टवेअर ऐवजी दुसरा कोणताही Bootable Pen Drive बनविणारा सॉफ्टवेअरचा वापर करु शकता, परंतु Rufus सॉफ्टवेअर चा User Interface हा युजर फ्रेंडली असल्यामुळे मी तुम्हाला Rufus वापरण्याचा सल्ला देईन. Rufus सॉफ्टवेअर डाउनलोड कसा करायचा ते मी खाली सांगितले आहे.

ऑपरेटिंग सिस्टम

तुमच्याकडे Windows 10 किंवा तुम्हाला ज्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी Bootable Pen Drive बनवायचा आहे, त्या Operating System ची ISO File तुमच्याकडे असायला हवी.

संगणक

Bootable पेन ड्राईव बनविण्यासाठीची जी Process करायला लागते त्यासाठी तुमच्याकडे संगणक असणे अनिवार्य आहे.

Rufus चा वापर करुन Bootable Pen Drive कसा बनवायचा ?

  1. Rufus सॉफ्टवेअर च्या मदतीने Bootable Pen Drive बनविण्यासाठी तुम्ही खालील Steps फॉलो करु शकता.
  2. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला https://rufus.ie/en/ हि लिंक तुमच्या Browser मध्ये ओपन करायची आहे.
  3. त्यानंतर तुमच्या समोर जे Page ओपन होईल ते थोडे स्क्रोल डाऊन करुन ‘Rufus 3.17 (1.3 MB)’ या ऑप्शनवरती Click करा.
  4. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Software Downloading चा डायलॉग बॉक्स ओपन होईल, आता Save या ऑप्शनवरती Click करा.
  5. Rufus सॉफ्टवेअर डाऊनलोड झाल्यानंतर तो सॉफ्टवेअर ज्या Folder मध्ये सेव केला आहे तो Folder ओपन करा.
  6. आता Rufus सॉफ्टवेअर वरती Right Click करुन ‘Run as Administrator’ ओप्शन वरती Click करा व समोर येणाऱ्या Yes या पर्यावरती Click करा.
  7. आता तुमच्या समोर Rufus सॉफ्टवेअर चा Interface ओपन झालेला दिसेल.
  8. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या Pen Drive ला Bootable करायचे आहे तो Pen Drive तुमच्या संगणकाला USB Port च्या माध्यमातुन Connect करा.
  9. आता Rufus सॉफ्टवेअर मधील Device या ऑप्शन वरती Click करुन,  Dropdown List मधील तुम्हाला ज्या Pen Drive ला Bootable बनवायचे आहे तो Pen Drive सिलेक्ट करुन घ्या.
  10. त्यानंतर Boot Selection या ऑप्शनमधील ‘Disk or ISO Image’ या ड्रॉपडाऊन पर्यायाला सिलेक्ट करुन घ्या.
  1. त्यानंतर Boot Selection मधील Select या पर्यावर क्लिक करुन तुमच्या कॉम्प्युटर मधील तुम्हाला जी Operating System हवी आहे त्या OS ची ISO फाईल सिलेक्ट करुन घ्या.
  2. आता Partition Scheme या ऑप्शन मधील GPT हा ड्रॉपडाऊन लिस्ट मधील पर्याया निवडा. (Dropdown लिस्ट मध्ये तुम्हाला GPT या पर्यायासोबतच MBR हा पर्याय देखील उपलब्ध आहे, तुम्ही तुमच्या संगणकाच्या Specification नुसार GPT किंवा MBR हा पर्याय निवडु शकता.) आजकालच्या संगणकांसाठी GPT हा ऑप्शन निवडणे योग्य राहिल.
  3. तुम्हाला जर तुमच्या Pen Drive ला Rename करायचे असेल तर तुम्ही Volume Label या Option च्या माध्यमातुन तुम्ही Rename करु शकता.
  4. त्यानंतर File System या ऑप्शन मधील ‘FAT32 (Default)’ हा पर्याय निवडा.
  5. आता तुम्हाला ‘START’ या ऑप्शनवरती click करायचे आहे, click केल्यानंतर तुमच्या समोर Pen Drive Bootable करण्यासाठीची Process सुरु होईल.
  6. काही मिनिटानंतर हि Process पुर्ण होईल, Process Complete झाल्यानंतर तुमच्या समोर Green कलरमध्ये ‘Ready’ असा मेसेज Show होईल त्यानंतर तुम्ही Rufus Software ची Window बंद करु शकता.
  7. आता तुमचा Pen Drive हा तुम्हाला ‘Bootable Pen Drive’ मध्ये रुपांतरीत झालेला दिसेल.

Bootable Pen Drive विषयीचे तुमचे FAQs

Bootable Pen Drive साठी किती GB चा पेन ड्राईव योग्य राहिल ?

तसे बघितले तर फिक्स असे काहि नाही, सर्वसाधारणपणे तुम्ही जर Windows साठी Pen Drive हा Bootable बनवणार असाल तर आजच्या वेळेत तुम्हाला कमीत कमी 8 GB चा पेन ड्राईव वापरणे योग्य राहिल.

Bootable Pen Drive ला आपण Un-Bootable करु शकतो काय ?

हो नक्की, तुम्ही Bootable पेन ड्राईव ला Un-Bootable पेन ड्राईव मध्ये रुपांतरीत करु शकता. यासाठी तुम्हाला एक वेगळी Process फॉलो करावी लागेल.

निष्कर्ष

मी आशा करतो कि या Article द्वारे तुम्हाला समजले असेल कि Bootable Pen Drive कसा बनवायचा ? Booting म्हणजे काय, Bootable Pen Drive चे फायदे कोणते आहेत तसेच Bootable पेन ड्राईव बनविण्यासाठी कोण-कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. यामध्ये मी तुम्हाला अत्यंत सरळ व सोप्या पद्धतीने Bootable Pen Drive कसा बनवायचा याविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हाला सर्वकाही अत्यंत चांगल्या प्रकारे समजले असेल अशी मला अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त तुमच्या जर या Article विषयी काही शंका असतील तर नि:संकोच आम्हाला Comment करुन कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर आपल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करु.

तसेच तुमचा या Article विषयीचा अमुल्य अभिप्राय आम्हाला Comment करुन नक्किच कळवा. आम्हाला आपला अभिप्राय वाचताना आनंदच होईल, धन्यवाद !!

Rohit Patil
Rohit Patilhttps://TechnicalKida.com/
नमस्कार मित्रांनो, मी रोहित पाटील, टेक्निकल किडा या वेबसाईट चा Founder आणि Author आहे. शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर, मी Geoinformatics (GIS & Remote Sensing) या विषयातून Diploma चे शिक्षण पुर्ण केले आहे, तसेच मी सध्या MBA (Production and Operations Management) चे शिक्षण घेत आहे. Geoinformatics या विषयातून Diploma चे शिक्षण घेत असतांनाच मला Web Development, कॉम्प्युटर, Latest Technology, इंटरनेट, GIS & Remote Sensing, बँकिंग, स्मार्टफोन्स, सोशल मीडीया टिप्स व Digital Marketing या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगलीच रुची निर्माण झाली होती. यामुळे मी असा निर्णय घेतला कि या ब्लॉग च्या मदतीने आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्या सर्वांना या सगळ्या विषयांबद्दल सर्वोत्तम असे मार्गदर्शन करु शकतो. मला आता Technology संबंधित वेग-वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात व माझ्या वाचकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

नवीन पोस्ट

 alt=

Subscribe to Our Newsletter

टेक्निकल किडा या वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व नवीन पोस्ट च्या सूचना सर्वात पहिल्यांदा तुमच्या ई-मेल वर मिळविण्यासाठी, तुमचा ई-मेल आयडी टाईप करुन Subscribe या बटणावर क्लिक करा.

Subscribe us on Youtube