Lockdown असल्यामुळे व घरातून बाहेर पडता येत नसल्यामुळेच अनेक सरकारी व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना Work From Home दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील घरुनच Online अभ्यासक्रम शिकवला जात आहे. Work From Home करण्यासाठी आणि घरी राहून Online अभ्यासक्रम शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी अनेक लोक Zoom Meetings App चा वापर करत होते.
पण Zoom App मधुन मागिल काही महिन्यांपुर्वी अनेक लोकांचा Important Data ईंटरनेटवर लिक झाला होता. यामुळे अनेकांच्या मनात या App च्या सुरक्षतते विषयी शंका निर्माण झाल्या. त्यामुळे सर्वजण Zoom App ला पर्यायी मार्ग शोधू लागले.
या सर्व गोष्टींना मध्य नजर ठेऊन Google ने Google Meet हे ॲप सर्वांसाठी Launch केले आहे. Google Meet हे एक सुरक्षित App असल्यामुळे अत्यंत कमी वेळात लोकांमध्ये खुप प्रसिद्ध झाले. तुम्हाला Google Meet या ॲप विषयी अधिक माहिती मिळावी म्हणून मी या Article मध्ये सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे कि Google Meet काय आहे आणि याचा वापर कसा करावा.
अनुक्रमणिका
Google Meet काय आहे – What is Google Meet ?
Google Meet हे व्हिडीओ कॉन्फरन्स करण्यासाठीचा एक Platform आहे, कि ज्या माध्यमातुन आपण Video Conference द्वारे Meetings करु शकतो. Work From Home साठी तसेच Online Study करण्यासाठी हे ॲप खुप महत्त्वाचे मानले जाते.
गुगल मिट या App च्या माध्यमातुन आपण एकाच वेळेस 250 लोकांसोबत Meeting करु शकतो. हे App आपल्याला Free व Paid अशा दोन प्रकारामध्ये बघायला मिळते. तुम्हाला जर Free मध्ये Video Conference Calls करायचे असतील तर तुम्ही 100 लोकांसोबत Conference करु शकता व तेही 60 मिनीटांपर्यंत, पण जर 100 पेक्षा जास्त लोकांसोबत व 60 मिनिटांपेक्षा अधिक कालावधीसाठी Video Conference करायच्या असतील तर मात्र तुम्हाला Google Meet चे Paid Subscription घ्यायला लागेल.
Google Meet चा User Interface हा अगदीच User Friendly असल्यामुळे हे ॲप वापरण्यास खुप सोपे आहे. तुम्ही जर Zoom App चा वापर केला असेल तर तुम्हाला Google Meet ॲप वापरण्यास सोपे जाईल. तसेच Google Meet हे ॲप Zoom App पेक्षा अधिक Secure असल्यामुळे याचा वापर लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Google Meet ॲप डाउनलोड कसे करावे ?
तुम्हाला जर Google Meet या ॲपचा वापर करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हे ॲप तुमच्या Mobile मध्ये किंवा Computer मध्ये Download करायला पाहिजे. Google Meet हे ॲप Download केल्यानंतरच तुम्ही याचा वापर करु शकता. Android वापरकर्त्यांनी Google Meet डाउनलोड कसे करावे आणि Windows वापरकर्त्यांनी Google Meet डाउनलोड कसे करावे हे सविस्तरपणे मी खाली लिहीलेले आहे.
Android वापरकर्त्यांनी Google Meet डाउनलोड कसे करावे?
Android वापरकर्त्यांनी Google Meet डाउनलोड करण्यासाठी खालील Steps Follow करा.
- सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या Smartphone मध्ये Play Store ओपन करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही Play Store च्या Search Box मध्ये “Google Meet” असे Type करुन Search करा.
- आता तुमच्या समोर Google Meet हे Application दिसत असेल, आता तुम्ही “Download” बटणावर Click करुन त्यानंतर “Install Now” या बटणावर Click करा.
- तुमच्या Smartphone मध्ये यशस्वीरित्या Google Meet हे ॲप्लिकेशन Download व Install झालेले आहे.
Google Meet हे ॲप गुगलचेच असल्यामुळे Google ने याला Gmail सोबत Integrate केलेले आहे. त्यामुळे तुम्ही Gmail च्या माध्यमातुन देखील याचा वापर करु शकता.
Windows वापरकर्त्यांनी Google Meet डाउनलोड कसे करावे?
तुम्हाला जर Google Meet तुमच्या Computer वर किंवा Laptop वर वापरायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा Software डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही कोणताही Web Browser वापरुन Google Meet चा वापर करु शकता. त्यासाठी तुम्ही खाली दिलेली लिंक तुमच्या Browser मध्ये Open करुन Google Meet वापर करु शकता.
गुगल मिट लिंक :- https://meet.google.com
Google Meet चा वापर कसा करावा ?
तुम्ही तुमच्या Smartphone किंवा Computer मध्ये Google Meet चा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करु शकता. त्यासाठी तुम्ही खालील Steps Follow करु शकता.
Smartphone मध्ये Google Meet चा वापर कसा करावा ?
- सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या Smartphone मध्ये Google Meet ॲप Open करा.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या Google Account ने यामध्ये Sign in करा किंवा तुम्ही जर तुमच्या Smartphone मध्ये पहिल्यापासूनच Google Account जर Sign in केले असेल, तर तुमच्या समोर तुमचे Google Account दिसेल, तुम्ही ते Account Select करु शकता.
- आता तुम्हाला Continue या बटणावरती Click करायचे आहे व समोर दिसणाऱ्या Message ला Allow करुन Permission द्यायची आहे.
- आता आपल्या समोर 2 पर्याय दिसत असतील आणि ते म्हणजे New Meeting व Join with a code.
- New Meeting या Option चा वापर करुन तुम्ही नवीन Meetings सुरु करु शकता व त्या Meetings च्या Links तुम्ही त्यांना Share करु शकता ज्यांना तुम्हाला या Meeting मध्ये सहभागी करायचे आहे.
- Join with a code या Option चा वापर करुन तुम्ही दुसऱ्यांच्या Meetings मध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला ज्यांच्या Meetings मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांच्याकडून तुम्ही Joining Code घेऊ शकता व तो Code तुम्ही Join with a code या Option मध्ये Type करुन ती Meeting Join करु शकता.
Computer मध्ये Google Meet चा वापर कसा करावा ?
तुम्हाला Google Meet या ॲपचा वापर जर तुमच्या Computer मध्ये करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या Computer मध्ये Browser ओपन करायला हवा. त्यानंतर तुम्ही https://meet.google.com या वेबसाईटवर जावू शकता किंवा Google च्या Homepage वर जावून उजव्या साइटला असणाऱ्या बटणावर Click करा. त्यामध्ये तुम्हाला Google Meet हे ॲप दिसेल, त्यावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर Google Meet ॲप Open होईल.
-
New Meeting
या Option चा वापर करुन तुम्ही नवीन Meetings चालु करु शकता व त्या Meeting ची लिंक तुम्ही त्या लोकांना पाठवू शकता ज्या लोकांना तुम्हाला या Meeting मध्ये Add करायचे आहे. अश्या पद्धतीने तुम्ही नवीन Meetings करु शकता.
-
Enter a Code or Link
तुम्ही या Option चा वापर करुन दुसऱ्यांच्या Meetings Join करु शकता. म्हणजेच तुम्हाला ज्यांच्या Meeting मध्ये Join व्हायचे आहे त्यांच्या Meeting चा Code या Option मध्ये Type करुन आपण त्या Meeting मध्ये Join होवू शकता.
वरील दोन्ही Option चा वापर तुमच्या Gmail च्या माध्यमातुन देखील तुम्ही करु शकता, Gmail सोबत Google Meet हे ॲप Integrate केलेले आहे. त्यामुळे Google Meet Open न करता देखील आपण Gmail च्या माध्यमातुन Google Meet या ॲप चा वापर करु शकतो.
Google Meet वापरण्याचे फायदे कोणते आहेत ?
Google Meet हे ॲप वापरण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
- गुगल मिट या ॲप च्या माध्यमातून आपण Free मध्ये जवळपास 60 मिनीटांपर्यंत Video Conference करु शकतो.
- यामध्ये आपल्याला User Interface हा User Friendly असलेला बघायला मिळतो, यामुळेच आपल्याला हे ॲप वापरण्यास खुपच सोईस्कर वाटते.
- सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ॲपची सुरक्षितता, Google Meet हे ॲप Google Company चे असल्यामुळे हे पुर्णपणे सुरक्षित आहे. आपण निश्चिंत होवून याचा वापर करु शकतो.
- हे ॲप Gmail सोबत Integrated असल्यामुळे आपण Gmail मधुन पण याचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करु शकतो.
- Google Meet हे ॲप आपण कोणत्याही Device वर अगदी सहजतेणे वापरू शकतो, म्हणजेच Android, Apple, Computer, Laptop, Tablet यांसारख्या अनेक Device वरती आपण हे App वापरू शकतो.
- तसेच आपण Google Meet या ॲप वरती Video Conference चालू असताना, Participant सोबत Live Chat देखील करु शकतो.
Google Meet ची सर्विस कधीपर्यंत Free आहे ?
Google Meet ची सर्विस सर्वसाधारणपणे Individuals ना कायमस्वरुपी Free मध्ये आहे, म्हणजेच आपण दिवसाला 60 मिनिटांपर्यंत व 100 लोकांसोबत Video Conference Free मध्ये करु शकतो. 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ व 100 लोकांपेक्षा जास्त लोकांसोबत जर Video Conference करायची असेल तर मात्र आपल्याला Google Meet चे Paid Subscription घ्यायला पाहिजे.
निष्कर्ष
मी आशा करतो कि या लेखाद्वारे तुम्हाला समजले असेल कि “Google Meet काय आहे आणि याचा वापर कसा करावा” यामध्ये मी तुम्हाला अत्यंत सरळ व सोप्या पद्धतीने Google Meet चा वापर कसा करावा याविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मी नेहमीच वाचकांना संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो कि जेणेकरुन त्यांना या Article च्या संदर्भात इतर कोणत्याही Website किंवा Internet वर शोधण्याची गरज नाही. यामुळे त्यांचा वेळही वाचेल आणि त्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळेल.
तसेच तुमचा या Article विषयीचा अमुल्य अभिप्राय आम्हाला Comment करुन नक्किच कळवा. आम्हाला आपला अभिप्राय वाचताना आनंदच होईल, धन्यवाद !!